पारोळा प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील २२ वर्षीय तरुण काही दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झाला होता, परंतु दिनांक २२ रोजी त्याच्या कन्हेरे शिवारातील एका विहिरीत पडून मृत्यू झाल्या असल्याची घटना उघडकीस आली.
पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील अमोल मधुकर पाटील वय २२ हा दिनांक १३ जानेवारी रोजी घरी कोणालाच काही एक न सांगता निघून गेला होता या आधी देखील तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता, परंतु तो प्रत्येक वेळी घरी येऊन जात असे, मात्र यावेळेस तो घरी आलाच नाही.
दिनांक २२ रोजी सव्वा तीन वाजेच्या सुमारास गावातील नामदेव महारु पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत मिळून आला. यावेळी गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला त्यावरून त्याची ओळख पटली. याबाबत मनोज भगवान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Leave a Reply