एरंडोल – संपूर्ण देशात प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना एरंडोल येथेही पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राम मंदिर येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सोमवारी सकाळी आरतीचे नियोजन करण्यात आले तसेच अयोध्या येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण हे प्रोजेक्टर द्वारे लाईव्ह शहरवासीयांना दाखवण्यात आले. दुपारी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली विशेष हे की, मिरवणुकीत महिला वर्गांची उपस्थिती लक्षणीय होती दरम्यान महिला भगिनी विद्यार्थिनींनी नाचत गाजत एकच जल्लोष साजरा केला तसेच श्री रामाचा जयघोष करण्यात आला.(नागोबा मढी येथील प्रियंका प्रशांत महाजन यांनी रांगोळीने काढलेली श्रीरामाची व अयोध्या मंदिराची प्रतिकृती)
मिरवणुकीत तरुणांनी व बालगोपाल मंडळींनी लेझीम खेळत आनंदोत्सव साजरा केला . यावेळी आदिवासी बांधवांनी देखील मिरवणुकीचा भाग नोंदवत आनंद साजरा केला. मिरवणुकीत राम मंदिरचा देखावा व श्रीरामाची प्रतिमा साकारण्यात आली होती. तसेच तुषार सोनार यांनी प्रती शिवाजी महाराजा यांच्या वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, माजी लोकनियुक्त पारोळा करण दादा पवार ,एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष दशरथ भाऊ महाजन, किशोर भाऊ निंबाळकर,राजू आबा चौधरी, माजी नगरसेवक जगदीश भाऊ ठाकूर,पारोळा मार्केट कमिटीचे माजी सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांचा सह शहरातील अनेक सामाजिक व विविध राजकीय पदाधिकारी.पत्रकार यानी भेट दिली शहरात सकाळपासून संपूर्ण शहर राममय झालेले पाहवयास मिळाले.
महिला वर्गांनी सकाळी सळा रांगोळी , गुढी उभारून महिलांचे आनंदोत्सव गगनात भिडण्याचे पाहावयास मिळाले तसेच बालगोपाल मंडळींनी भगवे ध्वज सायकलवर लावून फिरताना दिसून आले. शहरातील मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. व संध्याकाळी मंदिरावर आरती करून दिव्यांनी मंदिर प्रकाश मय करण्यात आले शहरात दिवाळी साजरी होते की काय असे चित्र दिसून आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Very Good