जळगाव : राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. चोपडा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
आणि त्यांच्या उपस्थितीतच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावा होणार असल्याचे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.आहे पवार म्हणाले की अमळनेर येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत.
या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घन:श्याम अग्रवाल यांनी १०० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ दादाच्या हस्ते होणार आहे. यामुळे परिसरातील शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
Leave a Reply