Breaking

एरंडोल येथे प्रजासत्ताक दिनी दिमाखात शासकीय ध्वजारोहण, संविधान उद्देशिकेचे वाचन व तंबाखूमुक्तीची शपथ..!


एरंडोल प्रतिनिधी : येथे २६जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे रा.ती काबरे विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.या प्रसंगी आमदार चिमणराव पाटील , उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, मुख्याधिकारी विकास नवाळे, गटविकास अधिकारी दादाजी जाधव,प्रभारी आगार व्यवस्थापक भारती बागले,नायब तहसीलदार दिलीप पाटील,जगदीश साळी, प्रा शिवाजीराव अहिरराव,अशोक चौधरी जगदीश ठाकूर, प्रसाद दंडवते, आर.डी.पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण ,प्रा आर एस.निकुंभ, रोहिदास पाटील, ईश्वर बिऱ्हाडे शालिग्राम गायकवाड, पी.ओ.बडगुजर, कमर अली सैय्यद, विशाल सोनार,संभाजी इंगळे आदी मान्यवर शिक्षक ,प्राध्यापक शासकीय अधिकारी, कर्मचारी,पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*