Breaking

जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस एरंडोल येथे उत्साहात साजरा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते आयोजन


एरंडोल – जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालय आणि एरंडोल मतदान नोंदणी अधिकार कार्यालय याच्या वतीने दि.२५ जानेवारी रोजी एरंडोल येथे डी. डी. एस. पी. कॉलेज येथे १४ व्या राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद याच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड, तहसिलदार श्रीमती सुचिता चव्हाण, पारोळा तहसिलदार उल्हास देवरे, तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी, निवडणुक शाखा जिल्हा कार्यालयाचे तहसिलदार जितेंद्र कॅुवर, नायब तहसिदार सुनिल समदाने, निवृत्त तहसिलदार , सुदाम महाजन, वन अधिक्षक दत्तात्रय लोंढे, सहा. वनरक्षक सुदर्शन सिसव, महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, युथ आयकॉन रनजितसिंग राजपुत, देवेंद्र भालेराव निवडणुक नायब तहसिलदार, दिलीप पाटील महसुल नायब तहसिलदार, निवडणुक शाखा जि. का. जळगांव येथील अ. का. रविराज बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

नागरिकांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाध्य करण्यासाठी व विकास करण्यासाठी मतदान करावे आणि लोकांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन देशाला मजबूत करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी यावेळी केले

सदर कार्यक्रमात वय वर्षे १०० असलेल्या मतदारांचे गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा स्तरावर विशेष कामगीरी करणाऱ्या विविध तालुक्यातील अधिकारी व बी.एल.ओ यांचा सह निवडणूक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये सहभागी घेतलेल्या स्पर्धकचाही सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*