Breaking

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्राण येथे ईव्हीएम मशीन द्वारे प्रात्यक्षिक सादर


(प्रकाश कुवर) उत्राण प्रतिनिधी -एरंडोल निवडणूक शाखेच्या वतीने व तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील उत्राण गुह व अह गावात आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत प्रात्यक्षिक विशेष जनजागृती विषयी मोहीम राबवण्यात आली.या प्रसंगी ईव्हीएम मशीन द्वारे नागरिकांना मतदान कसे करावे व केलेले मतदान खात्रीशीर आहे का..? असे शेकडो ग्रामस्थांना प्रात्यक्षिक करुण दाखवण्यात आले.

यावेळी एरंडोल अंजनी मध्यम प्रकल्प वरिष्ठ अधिकारी लिपिक दिलीप पाटील, पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक प्रमोद चौधरी, पशुसंवर्धन शिपाई शामलाल सोनार ,कासोदा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल नितीन पाटील आदींनी सुमारे नागरिकांना ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवले.त्यावेळी उत्रान गुहचे सरपंच मोहिनी महाजन,उत्रान अहचे सरपंच रजनी धनगर,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,पंचायत समितीचे माजी सदस्य भागवत पाटील,बाजार समितीचे माजी संचालक आनंदा धनगर,काँगेसचे तालुका उपाध्यक्ष प्रिंन्स देशमुख ,उपसरपंच वाल्मिक ठाकरे,हरून देशमुख,पोलिस पाटील राहुल महाजन,प्रदीप तिवारी,पत्रकार प्रकाश कुवर ,यांच्यासह विविध संस्थेतील पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

इव्हीएमबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात अश्या ठीकठिकाणी प्रात्यक्षिक सादर करून जनजागृती केली जात असल्याचे एरंडोल निवडणूक शाखेच्या वतीने कळविले आहे


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*