एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील खडके बुदृक येथे घरगुती वापराच्या हंडीचा अचानक स्फोट होऊन यात रेशमबाई नामदेव गवळे वय -७०, ज्ञानेश्र्वर नामदेव गवळे वय-४५ व सोनाली ज्ञानेश्र्वर गवळे वय-४० असे तीन जण भाजले.
ही घटना २७ जानेवारी २०२३ शनिवार रोजी स्वयंपाक केला जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली तिघे जण २५ ते ३०टक्के भाजल्याची माहिती एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरा पर्यंत याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला काही एक नोंद नव्हती.
या घटनेबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरिक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पुरवठा निरिक्षक संदिप निळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तीनही जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचेवर प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले दरम्यान नेमका स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे अजून अस्पष्टच आहे.
Leave a Reply