एरंडोल: येथे सोमवारी २९ जानेवारी २०२४ रोजी महामार्ग चौपदरी समस्या निवारण नागरी कृती समितीचे पदाधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार ,उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांची संयुक्त बैठक खा.उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी खा.उन्मेष पाटील यांनी एरंडोलनजिक दोन ठिकाणी अंडरपास बोगदा व महाजन नगर ते दत्तमंदिरापर्यंत राष्ट्रीय महामार्गालगत दोन्हीं बाजूंना गटारी व इतर संसाधनांसह इत्यादी कामे लवकरात लवकर कामे पुर्ण करण्याची सूचना वजा सकारात्मकता दाखवली.
राष्ट्रीय महामार्गाला कासोदा संलग्न मार्ग येथे सुमारे ४मीटर उंचीचा अंडरपास बोगदा तयार करणे,दूरसंचार कर्यालयानजीक पिंप्री रस्त्यावर अंडरग्राउंड बोगदा तयार करणे, महाजन नगर ते दत्त मंदिरापर्यंत महामार्गाच्या आजूबाजूला किमान साडेसात ते आठ मीटर रुंदीचे रस्ते तयार करणे त्यासाठी रस्त्यालगतची अतिक्रमणे काढणे, समांतर रस्त्यांना गटारींसह इतर संसाधनांची कामे होणे , महामार्गावर पथदिवे लावणे इत्यादी मागण्या खासदार उन्मेष पाटील यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या. यावेळी खा. उन्मेष पाटील यांनी धरणगाव चौफुली ते दत्तमंदिरापर्यंत शिघ्रगतीने पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
माजी आ.महेंद्रसिंग पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी ,दशरथ महाजन, माजी नगरसेवक विजय महाजन,डॉ.प्रविण वाघ, माजी जिप सदस्य नानाभाऊ महाजन, महाविद्यालये अध्यक्ष अमित पाटील माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, शालिग्राम गायकवाड इ. मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. माजी नगराध्यक्ष राजेन्द्र चौधरी,रमेश महाजन,देविदास महाजन,दुर्गादास महाजन,भा.ज.पा.तालुकाध्यक्ष राजेन्द्र पाटील,डॉ.सुरेश पाटील,गणसिंग पाटील,प्रसाद दंडवते,निलेश परदेशी,शरद काबरे यांनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार अनुपकुमार श्रीवास्तव, महामार्ग प्राधिकरण अभियंता दिग्विजय पाटील,श अशोक चौधरी,अरुण माळी,किशोर निंबाळकर,आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गोरख चौधरी यांनी केले. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज महाजन यांनी केले.
Leave a Reply