Breaking

एरंडोल बस स्थानकावरील महिलेच्या ४८ हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविले.


एरंडोल: येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यानी भडगाव बस मध्ये चढत असताना शोभाबाई माणिक पाटील वय ७२ रा.आडगाव ता. एरंडोल या महिलेच्या ३२ ग्रॅम वजनाच्या अंदाजे ४८ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगडीवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत पोबारा केल्याची घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

शोभाबाई पाटील हे जळगाव येथे कामानिमित्त गेले असता दुपारी परत येताना ही घटना घडली,याबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुनील लोहार हे करीत आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*