एरंडोल – वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या एरंडोल मार्गावर काही ठिकाणी पथदिवे बंद राहत असल्याने वेगवान मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विद्युत विभागाने याबाबत खबरदारी घेण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. पालिकेने तत्काळ याबाबत देखभालविषयक आवश्यक तो बदल न केल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील दत्त मंदिरापासून ते महाजन नगरापर्यंत दोन भराव पूल उभारण्यात आले असून त्या ठिकाणी विजेचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र हे पथदिवे शो-पीस ठरत आहेत. शहरालगत महामार्ग अजूनही अंधारात ठेवण्यामागे गौडबंगाल काय असा प्रश्न नागरीक व वाहनचालक करित आहेत.
धरणगाव चौफुलीवर पथदिव्यांसाठी पोल व बल्ब लावण्यात आले आहेत पण महामार्ग प्रकाशित करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण यंत्रणेला मुहूर्त कधी सापडणार असा प्रश्न उपस्थित होतो. पथदिवे नसल्यामुळे शहरालगतची महामार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळी अंधारात सुरू असल्यामुळे असुरक्षितता वाढली आहे. एवढेच नव्हे तर काही वेळा रात्रीच्या अंधारात अपघात ही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पथदिवे सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
Leave a Reply