Breaking

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय “राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह” अजित पवारांचाचं


मुबंई – शिवसेना पाठोपाठ आता राजकीय घडामोडीत पुन्हा मोठी बातमी समोर आली आहे अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली.

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

निवडणुक आयोगाने दिलेल्या निकाल शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाविरुद्ध शरद पवार गट काय भूमिका घेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*