Breaking

वयोवृद्ध महिलेची बायपास शस्त्रक्रिया ; आरोग्य दूत विकी खोकरे यांच्या प्रयत्नांनी मिळाले जीवनदान


धरणगाव – एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने धरणगाव तालुक्यातील पाळधी दोनगाव येथील राहणाऱ्या राजकोरबाई आनंदा पाटील वय वर्षे 78 या वयोवृद्ध महिलेवर इतक्या वयात जोखमीची बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत त्यांना जीवनदान दिले.आरोग्य दूत विक्की खोकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजकोरबाई यांना तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या असता त्यांचा हृदयाची रक्त प्रमुख वाहिन्या 100% 90% 80 % 95 %100 टक्के अश्या बंद आढळून आले त्यांना श्वास घेण्यास भरपुर त्रास होत होता त्यायामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.

परंतु वय पण जास्त असल्या कारणाने बायपास शस्त्रक्रिया करणे फारच जोखमीही होती अश्या वेळी रजोरबाई याचे नातेवाईक अॅड निलेश पाटील यांनी विक्की खोकरे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली व लागलीच विक्की खोकरे यांनी स्वतःच्या रुग्णवाहिका घेऊन त्यांना संगमनेर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल येथे गोकुल गोठेकर यांच्या मदतीने बायपास शस्त्रक्रियासाठी दाखल केले व हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर बायपास सर्जरी केली. सर्जरी नंतर राजोरबाईला नवजीवन मिळाले आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*