एरंडोल – आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणूका व मतदानबाबत जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुक्यातील शासकीय विभागाची आढावा बैठक एरंडोल नगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली.या बैठकीत लोकसभा कामकाचा बाबत पूर्वसूचना देण्यात आल्या.तसेच आदर्श मतदान केंद्र ,कंट्रोल रुम कॉस्टिंग केंद्र तयार करण्याच्या सूचना दिल्या.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली व योग्य त्या सूचना करण्यात आल्या मतदान केंद्रावर कोणकोणत्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले तसेच संवेदनशील मतदान केंद्राबाबत समर्पक सूचना करण्यात आल्या.
यावेळी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, पारोळा तहसीलदार डॉ उल्हास देवरे, गटविकास अधिकारी दादाजी जाधव,जळगाव जिल्हाधिकारी नगर विकास विभागाने सह.आयुक्त जनार्दन पवार,पोलीस निरीक्षक सतीश बोराडे, अधिकारी नायब तहसीलदार दिलीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार व माध्यम प्रतिनिधी संवाद साधला यावेळी अवैध धंदे वाळू तस्करी यांच्यावर प्रतिज्ञानात्मक कारवाई करण्यात येईल तसेच मतदान केंद्रात पंखे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रॅम्प यांच्यासह सात प्राथमिक सुविधा पुरविण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली आदर्श आचारसंहिते बाबत योग्य ती कार्यवाही होते किंवा नाही यावर लक्ष राहील.
एकंदरीत एरंडोल तालुक्यात लोकसभा निवडणुकीबाबत ची तयारी प्रशंशाकरण्या इतकी नसली तरी समाधानकारक तयारी दिसून आली असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले एरंडोल नगरपालिकेला मिळालेल्या कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांनी गौरव उद्गार काढले
Leave a Reply