एरंडोल: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यात येणार असून त्यांची एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे सायंकाळी सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर एरंडोल शहर शिवसेनेच्या पदाधिकारिंची नियोजन बैठक आठवडे बाजार परिसरातील शिवसेना कार्यालयात उत्साहात पार पडली.जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगरसेवक सुभाष मराठे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
प्रारंभी हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन व किशोर निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना समयोचीत मार्गदर्शन केले.
कासोदा येथे होणार्या सभेस्थळी शहरातून शिस्तबद्ध मोटारसायकल रॅली काढून सर्व शिवसेना पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते जाणार असल्याने नियोजन करण्यात आले तसेच जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी सभेला येण्याचे आवाहन ही करण्यात आले.या वेळी जेष्ठ शिवसैनिक रमेश महाजन,माजी नगरसेवक सुरेश खुरे,संजय महाजन,राजेंद्र ठाकूर,रमेश महाजन, आरिफ मिस्तरी,पिंटू भोई,अतुल महाजन,विक्की खोकरे, प्रमोद महाजन,संदिप बोढरे आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply