Breaking

गुरू श्री सेवानंदजी महाराज यांची शिकवण व विचार समाजाला प्रेरणादायी – खासदार उन्मेष पाटील


पारोळा: गुरू श्री सेवानंद जी महाराज यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य हे नव्या पिढीला स्मरणात ठेवण्यासारखे असून त्यांची शिकवण व विचार समाजाला प्रेरणादायी ठरणारे आहेत असे प्रतिपादन खासदार .उन्मेष पाटील यांनी पारोळा तालुक्यातील सांगवी तीर्थक्षेत्री नर्मदा जयंती महोत्सवात केले.

ज्यांच्या डोक्यावर गुरूंचा आशिर्वादाचा हात असतो त्यांच्या जीवनात शांती, समृद्धी व भरभराटी आल्याशिवाय राहत नाही असे विचार आ.चिमणराव पाटील यांनी तर फेसबुक, इंस्टा च्या जमान्यात देखील अध्यात्माचे अनन्यसाधारण महत्व आहे असे विचार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील हे होते.५१ कन्यांचे पूजन व साजश्रृंगार वितरण आ.चिमणराव पाटील व माजी नगसेविका अंजली करण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाधी पूजन,महाआरती व नर्मदा उद्यानाचे भूमिपूजन करण्याचा मान माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना देण्यात आला.नर्मदा माता व कन्या पुजन करतांना आमदार चिमणरावजी पाटीलभाविकांसाठी बांधण्यात आलेल्या श्री दादाजी भक्तनिवासाचे उद्घाटन खा.उन्मेष पाटील यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य नाना पोपट महाजन, एरंडोल शहराचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, प्रतिष्ठणाचे माजी अध्यक्ष जनार्दन (मामा) पाटील, सांगवी येथील सरपंच प्रविण पाटील, माजी सरपंच बाळू पाटील,नत्थू पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती.नर्मदा उद्यानाचे भूमिपूजन करतांना माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील,व माजी नगरसेविका अंजली ताई करण पवार.व दादाजी भक्त परिवारविश्वस्त तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप आप्पा पाटील, विश्वस्त छोटू बडगुजर, फकिरा उर्फ सपनानंद खोकरे, अनिल तांबटकर, बन्सीलाल देवरे,गोकुळ सोनार, रमेश चौधरी, ऍड.किशोर पाटील,दिपक वाघ किशोर पाटील, अविनाश जडे, आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.श्री दादाजी भक्त निवासाचे उदघाटन करताना खासदार उन्मेष दादा पाटील,व विश्वस्त मंडळतर या महोत्सवात वाल्मीक राजपूत, रमेश वाघ, प्रदीप राजपूत, महेश पाटील,अविनाश तायडे, संदीप राजपूत, नितिन राजपूत,राज देवरे,जगदिश पाटील,मंदिराचे पुजारी सुभाष भाऊ,राज देवरे,बाला राजपूत, छोटू पाटील, युवराज पाटील, सतीश पाटील, दगडू पाटील, रुपेश पाटील, स्वप्नील राजपूत, मंगलसिंग राजपूत,नितिन खोकरे, दुर्गश खोकरे, रीतिक खोकरे, मनोज खोकरे यांचे सहकार्य लाभले


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*