पारोळा – तालुक्यातील सांगवी येथील शासन मान्यताप्राप्त तीर्थक्षेत्री १००८ श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिरात फराळ महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम दि. ८/३/२०२४ रोजी सकाळी १०. वाजेला आयोजित करण्यात आले आहे.
गुरुमाऊली श्री सेवानंद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त शेकडोच्या संख्याने येत असतात म्हणून भाविक भक्तांना दर वर्षी महाशिवरात्री निमित्त फराळ प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी वाटप करण्यात येते.
सकाळी १०. वाजेला दादाजींची पुजा व महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाला सुरवात करण्यात येते.तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या फराळ महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) पाटील व विश्वस्त मंडळाने केले आहे
Leave a Reply