एरंडोल – शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री फकिरा खोकरे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल एरंडोल खान्देश रक्षक ग्रुपच्या वतीने (आजी-माजी सैनिक) श्री फकिरा भाऊ खोकरे यांचा भारतीय संस्कृतीनुसार मानाची टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.फकीरा भाऊ यांचे सामाजिक कार्य समाजासाठी फार प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला खरोखरच हे आमच्या सैनिकांसाठी देखील फार गर्वची व अभिमानाची बाब असल्याचे यावेळी आजी-माजी सैनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सत्कार प्रसंगी गणेश शिंदे, अनिल पाटील ,दिलीप बडगुजर, भगवान सोनवणे, ईश्वरलाल बडगुजर, सुवर्णसिंग जोहरी, काशिनाथ पाटील ,कृष्णा महाजन, रितेश शर्मा आदी खानदेश रक्ष ग्रुपचे आजी-माजी सैनिक उपस्थित होते
Leave a Reply