Breaking

महाराष्ट्र शासन पुरस्काराचे मानकरी फकिरा खोकरे यांचा तालुका तेली समाजाच्या वतीने सत्कार..


एरंडोल – महाराष्ट्र शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराचे मानकरी असलेले समाज भुषण फकिरा पुरणजी खोकरे यांचा एरंडोल तालुका तेली समाजाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार देऊन फकिरा खोकरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला खर तर हा शासनाने त्यांना त्यांची कामाची पावती दिली असे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.सत्कार प्रसंगी उद्योजक अनिल आबा चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी, तेली समाजाचे एरंडोल तालुका अध्यक्ष गुलाब भाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक भाऊ चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा (भगत)  चौधरी,पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अधिकारी आर पी.चौधरी, तेली समाज युवा शहर अध्यक्ष रविंद्र चौधरी,आरोग्य दूत विक्की खोकरे आदी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*