एरंडोल – येथे साईनगरमध्ये २२ वर्षीय युवकाने घराबाहेरील पोर्च मध्ये लोखंडी अँगलला दोराने बांधून गळफास घेतल्याची घटना १९ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घडली या बाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्तूची नोंद करण्यात आली अहे.
मृत युवक हा सिव्हील इंजिनीअरिंग चा डिप्लोमा धारक असून अविवाहित होता व एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे
येथील समाधान देवरे हे साईनगर मधील रहिवासी असून ते आदिवासी मुलांच्या शासकिय वसतिगृहात चतुर्थ कर्मचारी म्हणुन सेवेत आहे समाधान देवरे यांचा मुलगा अक्षय समाधान देवरे वय २२ वर्षे याचे सह परिवार घेऊन वॉक तालुका भडगांव येथे जवळच्या नातेवाईकच्या मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
कार्यक्रम पार पडल्यानंतर देवरे व त्यांचा मावसभाऊ हे दोघे दुचाकीने एरंडोलला परत जात होते अक्षय हा मंडपाच्या गाडीमध्ये एरंडोलला परतत होता तो यांच्या आधी एरंडोल येथे पोहचला दरम्यान समाधान देवरे व त्यांचा मावसभाऊ घरी पोहचल्यावर अक्षय याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे त्यांना आढळून आले त्याला खाली उतरविण्यात येवून एरंडोल ग्रामीण रुंगणालयात दाखल केले असता अक्षयचा मृतू झाल्याचे घोषीत करण्यात आले.
पोलिस निरीक्षक सतिष गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनिल लोहार अनिल पाटील मिलिंद कुमावत हे तपास करीत आहे
Leave a Reply