एरंडोल:-पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त यात्रा उत्सवासाठी येथील बस आगारातर्फे दहा ते बारा जादा बस गाड्या भाविकांसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती एरंडोल बस आगाराच्या व्यवस्थापक नीलिमा बागुल यांनी दिली आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर बस सेवा भडगाव चाळीसगाव संभाजीनगर नगर करमाळा मार्गे पंढरपूर पर्यंत देण्यात येणार आहे. एका गावाचे ४५ प्रवासी मिळाल्यास त्या गावाला बस गाडी पाठवून पंढरपूर यात्रेसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात येईल दरम्यान गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर साठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे
या सेवेचे भाडे ७०० रुपये आहे तरी भाविकांनी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
Leave a Reply