जळगाव – गुन्हे शाखेने चोरीची दुचाकी असल्याचे माहीत असतांनाही ती खरेदी करणाऱ्या एरंडोलच्या एक संशयिताला अटक करण्यात आली आहे.
फारूख हुस्नोद्दीन शेख रा.मुल्लावाडा,एरंडोल असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे
एरंडोल येथील फारूख हुस्नोद्दीन शेख याने चोरीची हीरो कंपनीची शाईन मोटारसायकल विकत घेतल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती त्यांनी कारवाईचे आदेश देत सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपुत, उप पोलिस निरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार सुनिल दामोदरे, महेश महाजन, राहुल बैसाणे, संदिप सावळे, अशोक पाटील, नंदलाल पाटील, शेखर पाटील नाईक पाटील, आदींनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले..
फारूक शेख याने ही चोरीची दुचाकी सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा.पथराड ता भडगाव) यांचा कडून खरेदी केल्याची कबुली दिली ही मोटरसायकल चोरीचा गुन्हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असुन सदर संशयित आरोपी व चोरीची दुचाकी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Leave a Reply