एरंडोल – मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला..
यावेळी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या आठ महिन्यापूर्वी समुद्रकिनारी लोकार्पण झालेला पुतळा कोसळणे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून तमाम महाराष्ट्र वासियांच्या तसेच शिवप्रेमींच्या जिव्हारी लागणारी आहे.
या महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले सागरी किल्ले दिमाखात उभे असताना आताच्या काळात सर्व अत्याधुनिक सुविधा असताना उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा शासनाच्या व नौदलाच्या निष्काळजीपणामुळे कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. ज्याप्रमाणे निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात हे राज्य शासन कोसळल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी याप्रसंगी केले..
यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरव करणारे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला याप्रसंगी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, शहर प्रमुख सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, कासोदा शहर प्रमुख समाधान चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, उपतालुकाप्रमुख रेवानंद ठाकूर ,माजी नगरसेवक सुभाष मराठे, विभाग प्रमुख गुड्डू चौधरी, शिवदूत निलेश अग्रवाल, युवासेना शहरप्रमुख जयेश महाजन, राजेंद्र ठाकूर, गजानन महाजन, गोपाल महाजन, संदीप पाटील, महेश महाजन, सुनील मराठे, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, भरत महाजन, काशिनाथ पाटील, हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply