पारोळा – तालुक्यातील तीर्थक्षेत्री असलेल्या श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी येथे सालाबादप्रमाणे स्व श्री गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते.बरेचदा अत्यावश्यक वेळी रुग्णास रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठाण सांगवी यांनी उपल्ब्ध करून दिली आहे.
म्हणून या रक्तदान शिबिरात दादाजी भक्त परिवार व परिसरातील रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रदीप पाटील व सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे
Leave a Reply