Breaking

जिल्ह्यात ज्वारी खरेदी सुरू करा ; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटलांची महासंघाकडे मागणी


पारोळा -: शासनाने जळगांव जिल्हयात ज्वारी खरेदी सुरु केलेली होती. परंतु बारदान (गोण्या) अभावी खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. शासनाने ३१ ऑगस्ट २४ ही मुदत खरेदी केंद्र सुरु ठेवण्यासाठी दिली असतांना प्रत्यक्षात बारदान (गोण्या) अभावी खरेदी बंद होती.

तसेच मागच्या आठवडयात मुख्यमंत्री, तसेच . उपमुख्यमंत्री हे जळगांव दौ-यावर आले असतांना त्यांनी ज्वारी खरेदीची मुदत १ महिन्यासाठी वाढवली असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे आदेश आले नाहीत. करिता जळगांव जिल्हयातील ज्वारी खरेदी त्वरीत सुरु करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

शेतकरी रस्त्या उतरतील.असे पत्र माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी पण महासंघ मुंबई यांना दिले आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*