Breaking

एरंडोलचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व शहर प्रमुख आंनदा चौधरी यांचा शिवसेनेना शिंदे गटास “जय महाराष्ट्र”


एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेंद्र दोधू चौधरी व शहर प्रमुख आंनदा रामदास चौधरी (छोटू भगत) यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना राज्य सचिव संजय मोरे व जिल्हा शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील यांना पाठविला आहे.

उभयतांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात राजकिय शेत्रात खळबळ माजली आहे पक्षाच्या बैठकीत आपल्याला वेळोवेळी आमंत्रित केले जात नाही विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे राजीनामा दिल्याचे उभयतांनी सांगितले विशेष हे की दोघही पदाधिकारी आमदार चिमणराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जातात.

विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असतांना दोघं मान्यवरांनी पक्षाचा दिलेला राजीनामा आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना मोठा राजकिय झटका असल्याचे सुर राजकिय गोटातून उमटत आहे
तसेच लवकरच आपण आपली पुढील राजकिय वाटचाल शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाहीर करू अशे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*