एरंडोल- येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांची नगर पालीका ओझर ( नाशिक ) येथे बदली झाली आहे विशेष हे की अवघ्या ५७ दिवसात देशमुख यांची बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१ फेब्रुवारी २०२४ पासून जवळपास सहा महिने जिल्हा अधिकारी कार्यालयातील प्रशासन अधिकारी जनार्दन पवार हे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता ६ महिन्यांच्या प्रभारी राज नंतर किरण देशमुख हे मुख्य अधिकारी म्हणून एरंडोल न. पा .ला लाभले होते देशमुख हे २०१२ ते २०१५ व २०१८ ते २०२१ या कालावधीतही ते एरंडोल येथे मुख्याधिकारी होते त्यामुळे त्यांना एरंडोल येथील नागरी समस्यांची चांगल्या प्रकारे जाण होती .त्यांची ओझर येथे बदली झाली आहे
Leave a Reply