धुळे :-अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या संवर्गातून भरण्याच्या प्रक्रियेला विरोध करीत अखिल भारतीय वाल्मिकी महासभा तर्फे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात दिलेली लेखी निवेदनात म्हटले आहे की सुधारित शुद्धिपत्रक निर्गमित करावे अन्यथा भरती प्रक्रियेबद्दल उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
अखिल भारतीय वाल्मीकी महासभेचे प्रदेश महासचिव नागेज कंडारे यांच्या नेतृत्वाखाली धुळे येथील कल्याण भवन पासून मोर्चाला सुरवात झाली. विजय पवार, धनराज पवार,आनंद जावडेकर, लखन चांगरे, सुभाष हसकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षण असल्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्वयंस्पष्ट निर्देश असतानाही काही पदे खुल्या संवर्गातून भरण्याची तयारी झाली आहे. याप्रक्रियेवर आक्षेप घेत अखिल भारतीय वाल्मिकी महासभेने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले आहे. संबंधित पदांबाबत तातडीने सुधारित शुद्धी पत्रक निर्गमित करावे, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल.
Leave a Reply