एरंडोल (विक्की खोकरे ) : – एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ हर्षल माने (पाटील) यांच्या प्रचाराला आता वेग धरला आहे. निष्ठावान शिवसैनिक व नेत्यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असून, प्रचाराच्या फेऱ्यांना होणारी गर्दी पाहता डॉ हर्षल माने यांच्या प्रचाराने आता मतदारसंघातील नागरिकांवर प्रभाव पडत असल्याचे दिसून येत आहे.
आज (दि.८) सकाळी 8 वाजता पद्मालय येथे श्री गणपतीचे दर्शन करून आपल्या प्रचार अभियानाला सुरवात केली. नंतर गालापुर, ताडे, भातखेडा, प्रिप्रीसिम, हनमंतखेडे सिम, बाम्हणे,उत्राण,तळई अतुर्ली, जवखेडे सिम निपाणे,आनंदनगर ताडा या गावी त्यांचे प्रचार करत असताना त्यांचे गावात जोरदार स्वागत होत आहे त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या जात आहे . त्यामुळे प्रचार फेरीची जोशपूर्ण वातावरणात होते. तर अनेक महिलांनी डॉ.हर्षल माने यांचे औक्षण करत आशीर्वाद दिले.यावेळी गावोगावी नागरिकांना भेटून संवाद साधला. या ठिकाणी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी डॉ हर्षल माने यांना शुभेच्छा दिल्या.तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर दिले आश्वासन या प्रचार रॅली दरम्यान डॉ हर्षल माने यांनी मतदारसंघातील तरुणांशी संवाद साधताना, रोजगाराच्या मुद्द्याला विशेष प्राधान्य दिले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की , आपल्या मतदारसंघातील अनेक युवकांना पुणे मुबंई येथे बाहेर गावी जाऊन अल्प अश्या पगारावर नोकरीसाठी धडपड करावी लागते आणि त्यामुळे कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते, ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. मी निवडून आलो तर तरुणांच्या रोजगारासाठी प्रभावी उपाययोजना करेन व मतदार संघातील तरुणांना तालुक्यातच रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.डॉ हर्षल माने यांच्या या प्रचार मोहिमेत निष्ठावान शिवसैनिक, पदाधिकारी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ हर्षल माने यांच्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे संचार झाले असून, त्यांनी एकजुटीने प्रचारात झोकून दिल्याने, ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.डॉ.हर्षल माने यांनी जाहीर केलेल्या आश्वासनांमुळे एरंडोल पारोळा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक आशावादी वातावरण निर्माण होत असून, हीच आशा आता ऊर्जा बनून येत्या निवडणुकीत डॉ हर्षल माने (पाटील) यांना एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आणेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. डॉ हर्षल माने यांना जनतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे विरोधकांची धडकी भरली आहे
Leave a Reply