पारोळा प्रतिनिधी – धरणगाव रस्त्यावर राजवड गावानाजिक दिनांक १४/१/२४ रोजी दूपारी २ वाजता दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडकून त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यातील एकाचा १५ रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता पारोळा येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
याबाबत राजवड़ कडे जाणाऱ्या व पारोळ्याकडे येणाऱ्या दोन मोटारसायकली क्रमांक MH.१९ सीएल १४३६, तसेच एम एच एकोणावीस बी.एच ६४२६ या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जबर धडक झाल्यानंतर सदर दोघी व्यक्तीच्या डोक्याला व हाता पायान्ना जबर दुखापती झाल्या होत्या.
यातील जखमी दत्तात्रय वासुदेव भट वय ५६ राहणार धरणगावं यांचा आज दिनांक १५ सोमवारी सकाळी १० वाजता पारोळा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर मुकटी तालुका जिल्हा धुळे येथील जखमी
दीपक यशवंत पाटिल हा धुळे येथे उपचार घेत आहे.
Leave a Reply