Breaking

अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने यांच्या सौभाग्यवती पदर खोचून प्रचारास सहभागी


एरंडोल – एरंडोल पारोळा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने (पाटील) यांचा ग्रामीण भागात होम टु होम प्रचार व संवाद साधत असल्याने इतरांच्या तुलनेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. यात त्यांच्या सौभाग्यवती डॉ दिपाली हर्षल माने यांनीही पदर खोचुन प्रचारात सहभाग घेतला.

दिपालीताई डॉक्टर असल्याने वैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी तालुक्यातील गोरगरीब रुग्णाची अहोरात्र सेवा केली आहे त्याची ही आरोग्य सेवा नागरीकांच्या लक्षात आहे. नागरीकांच्या याच आशीर्वादाच्या जोरावर डॉ दिपालीताई माने मतदारसंघात नागरिकांनीशी संवाद साधत प्रचार करत आहे. त्यामुळे या डॉ.माने दाम्पत्याला नागरीकांकडून भरपूर आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांच्या प्रचार रॅलीतुन दिसून येते आहे. प्रचार रॅलीत सर्वसामान्य नागरीक भरभरुन सहभागी होत आहेत.खेड्यापाड्यात डॉ हर्षल माने व डॉ दिपालीताई माने प्रचारासाठी जात आहेत तेथील प्रत्येक महिला,पुरूषांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. महिला त्यांच्या औक्षण करुन विजयासाठी आश्वस्त करीत आहेत. एकीकडे डॉ हर्षल माने तर दुसरीकडे त्यांच्या सौभाग्यवती दिपालीताई माने यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीची आता विरोधकांना धडकी भरल्याचे चित्र एरंडोल पारोळा मतदारसंघात तयार झाले आहे. या प्रचार रॅलीत महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*