एरंडोल – विधानसभा मतदारसंघमधील अपक्ष उमेदवार डॉ.हर्षल माने(पाटील) यांना प्रचारात दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.दिनांक १० रोजी टाकरखेडा, वैजनाथ, कढोली, खेडी खुर्द, रवंजे बु-खु, दापोरा, वरखेडी,खेडगाव तांडे, खडके, खर्ची, रवंजा, रिंगणगाव, पिंपळकोठा प्र.चा, सावदे खेडी, या भागात प्रचार करतांना आबालवृद्धांपासून तर महिला भगिनींकडून डॉ.हर्षल मानेना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी “हर्षल दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी घोषणा उपस्थित समर्थकांकडून मोठ्या जल्लोषात देण्यात आल्या डॉ हर्षल माने यांचे अनेक महिलांनी औंक्षण केले.प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला उत्साह हा अभूतपूर्व असून या प्रचार रॅलीने अनुकूल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध दिसून आले आहे. जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आपल्याला आगामी विजयाचा विश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार डॉ हर्षल माने यांनी दिली. प्रसंगी रॅलीमार्गातील महापुरुषांना अभिवादन करत विविध मंदिरात जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेत डॉ.हर्षल माने यांनी आशीर्वाद घेतले.
येत्या २० तारखेला अं क्र नंबर १३ ‘बॅट’ या चिन्हावर बटन दाबून आपलं बहुमूल्य मत द्यावे असे आवाहन डॉ. हर्षल माने यांनी मतदारांना केले यावेळी प्रचाराला कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply