एरंडोल – एरंडोल पारोळा मतदारसंघात परिवर्तनवाची लाट उसळली आहे. डॉ.हर्षल माने (पाटील) यांना मिळत असलेला वाढता प्रतिसादमुळे विरोधकांची धडकी भरली. डॉ हर्षल माने हे ‘बॅट’ या चिन्हावर अपक्ष उमेदवारी करत असताना ते मतदारसंघातील जनतेच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत असुन त्यांना जनतेने भरीव पाठिंबा दिला आहे.डॉ.हर्षल दादा मतदारसंघाच्या कान्या-कोपर्यात जाऊन परिवर्तनाच्या लढाईत सहकार्य देण्याचे आवाहन करत आहे. प्रचार रॅली प्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत असून. या निवडणुकीत डॉ हर्षल दादांच्या पाठिशी खंबीरपणे राहुन त्यांना “आमदार” बनवण्याची ग्वाही या प्रसंगी मतदारांनी दिली.या निवडणुकीत या गद्दारांना जनता-जनार्दन धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे अपक्ष उमेदवार डॉ हर्षल माने यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. प्रचार रॅली प्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Leave a Reply