पारोळा – एरंडोल येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम रामकृष्ण भांडारकर वय 55 हे पारोळा येथील कासार गल्लीमध्ये पापड विक्री करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक 14 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
एरंडोल येथे रहिवासी असलेले पुरुषोत्तम रामकृष्ण भांडारकर रा गाढव गल्ली, पांडव वाडा वय 55 हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पारोळा शहरात पापड विक्रीचा व्यवसामुळे प्रचलित होते सायकल वरून पापड विक्री करत होते, गेल्या वर्षभरापासून ते मोटर सायकलने शहरात रोज पापड विक्री करून आपला प्रपंच चालवत होते दिनांक 14 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पापड विक्री करत असताना कासार गल्ली या ठिकाणी त्यांची अचानक तब्येत खराब झाल्याने ते जमिनीवर पडले त्यांना लगेच कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता, याबाबत पारोळा पोलिसात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a Reply