जळगाव – आराध्यदैवत भगवान महावीर गोगादेवजी जयंतीच्या पावन दिनानिमित्ताने जळगाव येथे एरंडोल नगरीचे समाजसेवक तथा आरोग्य दूत युवराज फकिरा खोकरे ऊर्फ (विक्की खोकरे)यांच्या सामाजिक व रुग्णसेवा या कार्याचा गौरव म्हणून जळगावचे माजी नगराध्यक्ष तथा समाजभुषण भैय्यासाहेब मा.श्री शिवचणजी ढंढोरे यांच्या हस्ते गोगादेव मंदिरात सत्कार सन्मान करण्यात आले.
यावेळी भगवान श्री गोगादेव उत्सव समितीचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री संदिप भैय्या ढंढोरे व समाज बाधव उपस्थित होते,आम्हाला अभिमान वाटतो की मेहतर समाजाचा मुलगा गोर गरिब रुग्णाच्या मदतीला अहोरात्र रुग्णसेवा करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून मुक्त करतो व त्यांना जीवनदान देतो खरंतर ही बाब मेहतर समाजासाठी फार गौरवास्पद असल्याचे भैय्यासाहेब शिवचरणजी ढंढोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply