Breaking

रवंजे बु.येथे ३१४ ग्रामस्थांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ..


एरंडोल – तालुक्यातील रवंजे बु.येथे वनिता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन भुमीपुत्र फाऊंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रवंजे बु., रवंजे खु. या गावांच्या परिसरातील ३१४ ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी डॉक्टरांनी रूग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याबरोबरच जीवनशैलीत बदल,आहार, व व्यसनमुक्ती याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार महेंद्रसिगं पाटील होते.भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ.भुषण सोमाणी, डॉ.भुषण पाटील, डॉ.नेहा काबरा, डॉ.पियुष पाटील, डॉ.रूतुजा पाटील, निलेश पाटील, नावेद शेख यांनी शिबिरात वजन,बी.पी. शुगर,इ सी जी व इतर आवश्यक तपासण्या केल्या. काही प्रमाणात औषध वाटप करण्यात आले.याप्रसंगी माजी जि.प.सदस्य जयश्रीताई महाजन, माजी सभापती मोहन कोळी, एरंडोल मंडळ अध्यक्ष योगेश देवरे, सरपंच नामदेव माळी, डॉ.डि.एस.महाजन, भिका कोळी, डॉ.नलीन महाजन, गोकुळ देशमुख,शरयु चौधरी, विकास पाटील,किरण कोळी,दापोरीचे सरपंच कुंदन कोळी,संजय तायडे, सुनील पाटील, संजय जाधव, मुकेश भालेराव,महारू पाटील आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक नानाभाऊ महाजन यांनी केले.सुत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रदीप देशमुख, जनार्दन कोळी,प्रतिक माळी, चंद्रकांत चौधरी यांनी परिश्रम घेतले.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*