Breaking

एरंडोल नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग सीमा जाहीर; हरकती व सूचना १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत


एरंडोल :एरंडोल नगरपरिषदेत नोव्हेंबर सन २०२५ मध्ये होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासंदर्भात महत्त्वाची जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी वॉर्ड प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यात आले आहे . म्हणून त्यासंदर्भातील हरकती व सूचना नागरिकांनी सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ पासून गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात असे कळविण्यात आले आहे.

दाखल केलेल्या हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याची स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार असल्याचे एरंडोल नगरपरिषदचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी यावेळी सांगितले आहे .


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*