एरंडोल – गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात बाजारपेठेत चैतन्य उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.यंदा पावसाळ्यात पावसाने ओढ दिली होती परंतु उशिरा का होईना गणरायाच्या कृपेने वरुण राजाचे आगमन झाल्याने शेतकरी राजा मात्र सुखावला असून गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाला आहे..
त्याच बरोबर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपती प्रतिष्ठापणेसाठी नागरिकांडून देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरात श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
घरगुती श्री गणरायाच्या देखाव्यासाठी विविध प्रकारचे कपड्यांचे मंदिर, आकर्षक विद्युत माळा, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आदी शोभिवंत वस्तू विक्रीसाठी बाजारात फुलला आहे.

Leave a Reply