एरंडोल – आगामी काळात साजरे होणारे महत्वाच्या सण उत्साहवांच्या पाश्र्वभूमीवर एरंडोल शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष रुट मार्च काढण्यात आला.
या रूटमार्चला शहर पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मरीआई चौक, बुधवार दरवाजा,मेन रोड, भगवा चौक,भोई गल्ली,पांडव वाडा,अमलनेर दरवाजा, गणेश विसर्जन मार्ग असे मार्गक्रमण करीत परत शहर पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्च मध्ये ४ पोलिस अधिकारी २३ पोलिस अंमलदार तसेच २८ होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सण उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित वाटावे या उद्देशाने हा रुट मार्च काढण्यात आला या रुट मार्चचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. या रुट मार्चमुळे शहरात सणासुदीच्या उत्साहा सोबतच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे

Leave a Reply