Breaking

प्रांताधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हरितक्रांती ;एरंडोलमध्ये २ एकर जागेत लावलेली ४०० रोपं झाली एक वर्षांची


एरंडोल (प्रतिनिधी) निसर्ग संवर्धनाची प्रेरणादायी उदाहरणं निर्माण करत एरंडोलचे प्रांताधिकारी मनिष गायकवाड यांच्या संकल्पनेतून लावलेली ४०० रोपं आता एक वर्ष पूर्ण करून हिरवीगार बहरली आहेत. कासोदा-एरंडोल ते म्हसावद रस्त्यालगतच्या शासकीय धान्य गोडाऊनच्या २ एकर ओसाड जागेत हे वृक्षारोपण करण्यात आले होते.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महसूल व पूरवठा विभागाच्या वतीने गेल्या जून २०२४ मध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते हे वृक्षारोपण पार पडले. यात निंब, चिंच, पिंपळ, वड अशा विविध देशी प्रजातींची रोपं लावण्यात आली होती.

ठिबक सिंचनातून हिरवळ टिकवली वृक्षारोपणानंतर रोपांची योग्य काळजी घेण्यासाठी प्रांताधिकारी मनिष गायकवाड यांनी वनविभागाच्या सहकार्याने ठिबक सिंचन संच बसवला. धान्य गोडाऊन परिसरातील बोअरवेलमधून पाणी घेऊन ठिबक यंत्रणेतून रोपांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे.

या उपक्रमात एरंडोलच्या पिंटू राजपूत यांच्यावर रोपांची देखरेख, पाणीपुरवठा, ठिबक सुरू-बंद करणे व संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. परिसरात शेतकऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन काटेरी कुंपण देखील करण्यात आले आहे, ज्यामुळे रोपांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. “लावलेली सर्व ४०० रोपं आज तग धरून उभी आहेत, याचे वेगळेच समाधान आहे. या उपक्रमात अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रातधिकारी मनिष गायकवाड यांनी यावेळी सांगितले.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*