एरंडोल -येथे बालाजी मित्र मंडळ चिंतामणी मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ दत्त कॉलनी मित्र मंडळ मधुकर नगर मित्र मंडळ रेणुका नगर मित्र मंडळ संकट मोचन मित्र मंडळ या सामाजिक संस्था तर्फे २९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ४० ते ५० युवक व नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.
सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. विशेष हे की ईश्वर सोनार यांनी सर्वात आधी रक्तदान करून युवकांपुढे आदर्श ठेवला. या शिबिरासाठी रेड प्लस सोसायटीचे रवींद्र पाटील, अशोक कोळी, वैष्णवी ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुरली कोळी समाधान पाटील ,विशाल पाटील ,मोहित सोनार दिनकर पाटील, साईनाथ चौधरी हरीश महाजन , होनाजी बोरसे, अनिल पाटील, सुभाष अहिरे, ज्ञानेश्वर महाजन करण वाघ सोहम देशमुख, जीवन पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply