Breaking

अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा ; गोर बंजारा समाज संघटनेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन


एरंडोल – तालुक्यातील गोर बंजारा समाज या संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देऊन गोरं बंजारा समाजास महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.गोर बंजारा समाज इतिहास, परंपरा, जीवनशैली, शैक्षणिक वंचितता व सामाजिक आर्थिक स्थिती याबाबत निकषांनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र असूनही केवळ महाराष्ट्रात गोर बंजारा समाजास व्ही जे एन टी/ए प्रवर्गात ठेवण्यात आले आहे.परिणामी बंजारा समाजावर घोर अन्याय झाला आहे.असे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात तीन ऐतिहासिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.निवेदन देतांना राजू राठोड देशमुख (माजी सरपंच आनंदनगर), नारायण पवार ( खेडगांव सरपंच), निंबा पवार, सुरेश राठोड, गोविंदा राठोड,सोमा राठोड, दिनेश राठोड,प्रविण राठोड, योगेश राठोड, राहुल राठोड,नवल चव्हाण, पिंटू चव्हाण, दिनेश चव्हाण, समाधान राठोड, मुकेश राठोड, मुकेश पवार, जितू राठोड, जितू पवार, ज्ञानेश्वर राठोड, प्रशांत पवार,नंदू चव्हाण आदी समाज बांधव उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*