Breaking

अंजनी धरण भरलेले तरीही पाच दिवसाआड पाणी का ? ; एरंडोलकरांचा सवाल


एरंडोल : अंजनी धरण पाण्याने शंभर टक्के भरलेले असतानाही एरंडोल शहराला केवळ पाच दिवसाआडच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही काही भागात ठराविक वेळेला पाणी येते. काही ठिकाणी कधी दुपारी,कधीसंध्याकाळी तर कधी मध्यरात्री पाणी सोडले जाते. शहरातील सर्व नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी नियमित वसूल केली जाते. मात्र प्रत्यक्षात वर्षातील ३६५ दिवसांपैकी अवघे ६० दिवसच नळांना पाणी मिळते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणारे अंजनी धरण भरलेले असताना पाणीपुरवठा पाच दिवसाआड का? प्रत्येक झोनला ठराविक वेळ का नाही? असे सवाल केले जात आहेत.
ऐन पावसाळ्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. पाण्याच्या वितरणाचे नियोजनच नसल्याने पाणी असूनही नागरिकांना ते मिळत नाही. नागरी पाणीपुरवठ्यात नियोजनाचा अभाव असल्यामुळे काही भागात विशिष्ट वेळेला नळास पाणी सोडले जाते तर काही भागांमध्ये केव्हाही पाणी सोडले जाते. प्रत्येक भागाला नगरपालिकेने पाणी वितरणाची निश्चित वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी नागरिकां कडुन  होत आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*