पारोळा प्रतिनिधी – तालुक्यातील सावरखेड येथे घरफोडी होऊन त्यात ६०००० रुपये रोख आणि ९४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात भालेराव शंकर पाटील सावरखेडे यांनी फिर्यादी दिली की, दिनांक १४ ते दिनांक १७ रोजी दरम्यान सावरखेडे गावी त्यांचे रहाते घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ८०,हजार रुपये . किमतीचे ४ तोळे वजनाची सोन्याची मंगल पोत,१२५००/- रु. किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५००/-रु. किमतीची ५ भार चांदी त्यात चांदीचे कडे, ६००००/- रु. रोख असे ऐकून १ लाख ५३.५००./- रुपयांच्या एवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरमालक हे दिनांक १४ते १७ दरम्यान रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराचे दोन्ही दरवाज्याचे कुलुप तुटुन लोखंडी कपाट उघडे होते व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने लोखंडी कपाट मधील लॉकर चेक करुन पाहीले असता सदर कपाट मधील लॉकर मध्ये ठेवलेल्या वस्तु दिसल्या नाहीत.
म्हणून भालेराव पाटील यांच्या फिर्यादिवरून अज्ञात चोरट्यां विरुध् गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.
Leave a Reply