Breaking

धनगर व बंजारा समाजास प्रवर्गात आरक्षण देऊ नका ; भिल समाज विकास मंच संघटनेतर्फे विरोध


एरंडोल – हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास भिल समाज विकास मंच या संघटनेतर्फे विरोध करण्यात आला आहे. या संदर्भात सदर संघटनेच्या वतीने १९ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रपती, राज्यपाल, अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे,सोशल मिडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब मोरे,निहाल सोनवणे,लक्ष्मण जावळे, दिपक सुर्यवंशी, मनोज मालचे,बादल ठाकरे,आकाश वसावे,मगन वळवी,विनोद पाडवी, अमित तडवी,रोहीत भिल, योगेश ठाकरे,सागर खैरनार आदी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*