Breaking

उत्राण येथे विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा मुसळधार पावसाचे थैमान


उत्राण- (प्रकाश कुवर) येथे रात्री मुसळधार पावसाला सुरवात आणी काही वेळात ढग फुटी सारखा धो धो पाऊस सुरु झाला विजांचा कडकडाट ने भीतीचे वातावरण निर्माण झाले गावा जवळील कसतोऱ्या नाला व अहिर हद्द गावा जवळील शेती नाला या दोघ नाल्यांना महापूर आल्याने उत्रान गुजर हद्द व अहिर हद्द गावात पाणी शिरले ,नाल्या शेजारी राहणाऱ्या घराणं मध्ये शिरले त्यामुळे त्यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या तर अन्न धान्य ओले झाल्या नुकसान झाले.

भातखंडे येथील दूध व्यवसायिकाची पाण्यात मोटर सायकल वाहून गेली,उत्रान अहिर गावातील विजय सुरेश चव्हाण यांच्या घरावर विज कोसळल्याने घरातील इलेक्ट्ट्रिक उपकारणांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले घरातील छताला तळा निर्माण झाला तर त्यांची आई उर्मिला चव्हाण बाल बाल बचावल्या काळ होता पण वेळ नव्हता अशी स्थिती निर्माण झाली होती व सुदैवाने गरीब कुटुंब बचावले, दोघे नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाल्याने गावातील काही काळ दळण वळण थांबले, नाल्यांच्या पलीकडील वस्तींचा गावाशी असलेला संपर्क तुटला होता, शेतकऱ्यांचे शेतमालाचे खूप नुकसान झाले तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा हवालदील झाला आहे

शेतातील सोयाबीन ,कापूस ,मका, केळी, लिंबू पेरू, फळबागायत पिकांचे नुकसान झाले,गायी म्हशी पाण्यात अडकल्या,शेतातील पाणी नाल्यानं मध्ये आल्याने पूर स्थिती निर्माण झाली.गावातील पोलीस पाटील सरपंच यांनी नागरिकांना पुरा जवळ गर्दी.करू नये म्हणून सहकार्य केले,गावातील वयोवृद्ध नागरिकांनी सांगतले की आज पर्यंत या नाल्यांना एवढा महापूर कधी बघितला नाही,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*