Breaking

सांगवी येथे श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान मंदिरात स्वच्छता मोहीम : परिसर झाला चकाचक


पारोळा – अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पारोळा तालुक्यातील सांगवी येथे तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान परीसरात दादाजी विश्वस्त मंडळा तर्फे स्वछता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला.या मोहिमेमुळे भाविक वर्गातून स्वागत होत आहे तर परिसर स्वच्छ केल्याने समाधान व्यक्त केले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दादाजी धुनिवाले यांचा मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली..याप्रसंगी हे केवळ स्वच्छता मोहीम नसून या मुळे मन देखिल प्रसन्न होतो असं पाचोरा येथील अंबिका डेअरीचे संचालक तथा दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील यावेळी म्हणाले.स्वच्छता मोहिमेत विश्वस्त अध्यक्ष प्रदीप पाटील, विश्वस्त छोटू बडगुजर, अविनाश जडे, रमेश चौधरी, सपनांनद उर्फ फकिरा खोकरे, पोलिस पाटील बन्सीलाल देवरे,दिपक वाघ, अनिल तांबटकर, रमेश वाघ, भारती वाघ, मंदिराचे पुजारी सुभाष भाऊ, वाल्मीक राजपुत, अविनाश तायडे, विक्की खोकरे, कुणाल देवरे आदींनी सहभाग घेतला होता


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*