पारोळा – तालुक्यातील म्हसवे शिवारात अवैधरीत्या गॅस भरताना तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन ओमनी जळून खाक झाल्या .
पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन ओमनींमध्ये अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या स्टॉपवर गॅस भरण्यासाठी आल्या होत्या.गाडींमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलिंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या.हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दूरवर पोचला. त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले.याबाबत माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली.आग विझल्यानंतर अग्निशमन दलाने याठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ गॅस सिलिंडर ताब्यात घेतले.
जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरीत्या गॅस कोण भरत होते. ही वाहने कोणाची होती. हे मात्र समजले नाही.यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
Leave a Reply