एरंडोल – अवघ्या एका दिवसांवर येवून ठेवलेल्या अयोध्येतील प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उंत्कठा व उत्साह शिगेला पोहचला आहे. जयराम श्रीराम जयजय राम नावाच्या नामस्मरणात अवघे देशवासीय मंत्रमुग्ध होत आहेत. हीच उंत्कठा व उत्साह एरंडोल येथेही असून सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले असून शहरवासीयामध्ये “राम नामाची” लहर पसरली आहे..
22 जानेवारी रोजी शहरात पांडव नगरी बहुउद्देशीय संस्था व शहरातील विविध हिंदू संघटनां व युवा वर्ग मित्र परिवारातर्फे संपूर्ण एरंडोल शहरात भगव्या पताका व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे झेंडे लावून संपूर्ण शहर हे भगव्येमय झाले आहे.
तर भगवा चौक परिसरात ऑइल पेंट कलर ने रस्त्यावर आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.
रविवार २१ जानेवारी २०२४ राम मंदिर येथे दुपारी साडेतीन ते साडेसात पर्यंत सुंदर कांड आयोजित करण्यात आले आहे .दरम्यान संध्याकाळी साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मध्यरात्री बारा वाजेला अयोध्या येतील राम मंदिराची प्रतिकृती ५१०० दिवे लावून साकारण्यात येणार आहे .
सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी सहा वाजेला अभिषेक व नंतर दहा वाजेला ५६ भोग व सकाळी ११ ते १ आयोध्या येथील मूर्ती स्थापना थेट प्रक्षेपण हे प्रोजेक्ट द्वारे दाखविण्यात येणार आहे तर दुपारी दोन ते सहा श्रीराम मंदिर पांडव वाडा, विठ्ठल मंदिर, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, माळीवाडा, भगवा चौक, ज्ञानदीप चौक, या मार्गाने शोभायात्रा काढण्यात येणार आहे .सात वाजेला महाआरती आयोजित करण्यात आली आहे. तर रात्री आठ वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
एरंडोल येथील गेल्या काही दिवसापासून रोज संध्याकाळी महिला मंडळातर्फे श्रीराम जय राम जय राम जयघोष करत संध्याकाळी रॅलीचे आयोजन करण्यात येत असून बाल गोपाल मंडळी यांनी आपल्या सायंकलींना जय श्रीराम चा भगवा झेंडा लावून शहरात भगवे वातावरण निर्मिती केली आहे..
Leave a Reply