एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील विखरण येथे दिनांक ३१/१२/२०२३ रोजी कांद्याच्या गोण्यावरूण ग्रामपंचायत चौकात झालेल्या हल्ला व मारहाण प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गू.र.नंबर २/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३०७,३२४, ३२३,१४१,१४३,१४९,४२७ अंतर्गत एकूण १३ आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींन तर्फे जळगाव येथील मे.जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. दिनांक २५/१/२४ रोजी जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येऊन मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपीतांचा योग्य त्या अटी शर्तीसह जामीन मंजूर केला.
सदरील जामीन अर्जाचे कामी अटकेत असलेल्या एकूण १३ आरोपींपैकी ८ आरोपीं तर्फे ॲड. अजिंक्य काळे,ॲड. आकाश महाजन व ॲड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले तर इतर आरोपीं तर्फे ॲड. अहमद सैय्यद व ॲड. मधुकर देशमुख यांनी कामकाज पाहिले.
Leave a Reply