एरंडोल: अन्नदान, वस्त्रदान व रक्तदान या दानांपेक्षा एखाद्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला आजारापासून मुक्तता मिळवून देणे अर्थात मृत्यू च्या दाढेतून बाहेर काढून रुग्णाला जीवनदान देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. असे जीवनदान अनेक रुग्णांना देण्याचे काम येथील आरोगयदूत विक्की खोकरे यांनी आजवर केले आहे.
२ आठवड्यांपुर्वी एरंडोल येथील आरती नामदेव पवार वय-२८ या युवतीस व्हॉल्व च्या आजारावर योग्य उपचारासह मोफत शस्त्रक्रिया करून तिला जिवनदान देण्यात आले.
विक्की खोकरे यांनी घोटी येथील एस.एम.बी.टी इस्पितळात आरती पवार हिला नेऊन त्या ठिकाणी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत मोफत उपचारासह शस्त्रक्रिया करण्यासाठी आपले वजन खर्च केले.त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आरतीवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाली अश्या प्रकारे विक्की खोकरे यांच्या आरोग्यदूत म्हणून असलेल्या कार्यात नवे पान जोडण्यात आले.
कोट: विक्की खोकरे हे आरोग्यदूत असल्याचे माझ्या ऐकण्यात आले होते परंतू त्यांनी माझ्या कन्येचे प्राण वाचवून तिला खऱ्या अर्थाने जिवनदान प्राप्त केले म्हणून खरोखर विक्की खोकरे हे खरे आरोग्यदूत आहेत याची प्रचिती आली.
——————————————
श्रीमती अंजुबाई पवार ,एरंडोल (रुग्णाची आई)
Leave a Reply